बाबा मोंडकर:मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार..
⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या सिद्धगडच्या पायथ्याशी असलेल्या काळ्या दगडाच्या क्रशरमुळे ऐतिहासीक गडाला धोका निर्माण होत असल्याने त्याठिकाणच्या ग्रामस्थांनी आपल्याकडे तक्रार दिलेली आहे. ही तक्रार घेऊन आपण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार आहे अशी माहिती भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी देत शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या बेनामी ठेकेदारीमुळेच नादुरुस्त झाले आहेत. कोट्यवधींची कामे घेऊन ती कामे दर्जाहिन करण्याचे पाप त्यांचेच आहे, असा आरोप त्यांनी केला
दोन दिवसांपूर्वी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी बंदर जेटी येथील स्टॉल्स वितरणात बाबा मोंडकर यांनी २५ लाख रुपयांची आपल्या घशात घातल्याचा आरोप केला होता. यावर श्री. मोंडकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बाबा मोंडकर यांनी सिदगडाच्या पायथ्याशी बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याने शासनाचे हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे, याकडे आपण मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे, असे सांगून बंदरजेटी येथील स्टॉलधारकांबद्दल माझ्यावर करण्यात आलेल्या टिकेचे उत्तर स्टॉलधारकांनीच दिलेले आहे. मी शासन यंत्रणेमार्फत त्यांना बंदरजेटीवर व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. दोन वर्षांपूर्वी यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांची दखल स्टॉलधारकांनी घेतलेली आहे. आज ते चांगल्याप्रकारे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याकडून कधीही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला नाही, असेही मोंडकर म्हणाले. जिल्हाप्रमुखांच्या बेनामी ठेकेदारीमुळे खड्डेमय रस्त्यांचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची कामे केलीत, तेथे काही महिन्यांनी डांबर वाहून गेलेले आहे. यामुळे डांबरीकरणातील रस्त्यातील डांबरच गायब करणारे आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी आपली सुरुवात कोणत्या धंद्यातून झाली हे विसरू नये. मी रिक्षा व्यवसाय करून आता हॉटेल व्यवसाय सन्मानाने करत आहे. पर्यटन व्यवसायात अनेकांच्या प्रश्नांवर सातत्याने न्याय देण्यासाठी लढा देत आहे. जिल्हाप्रमुखांनी कोणाला हाताशी धरून क्रशर कशाप्रकारे उभा केला हे सर्वसामान्यांना माहिती आहे, असाही आरोप मोंडकर यांनी केला.
दत्ता सामंत यांच्यावर पक्षांतर्गत कुरघोडीचा गंभीर आरोप करताना मोंडकर म्हणाले, ‘या दत्ता सामंताचे जे प्रमुख बगलबच्चे आहेत, ते जिथे जिथे आहेत, तिथे तिथे लोकसभा आणि विधानसभेमध्ये बूथ मायनस झाले आहेत. स्वतःची यंत्रणा उभी करण्याचे त्यांचे स्वप्न भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही. असेही श्री मोंडकर म्हणाले
