अंडरग्राउंड विज वाहिन्यासाठी आलेला ११ कोटींचा निधी परत जाण्यास साळगावकर कारणीभूत,अशा लोकांना पुन्हा राजकारणात आणू नये…

संजू परब:दीपक भाईंच्या नम्रतेमुळे सावंतवाडी शांत आणि सुंदर राहिली आहे, काही अपप्रवृत्तीचे लोक सत्तेत आले तर ही शांतता बिघडेल..

⚡सावंतवाडी ता.२४-: अंडरग्राउंड वीजवहनासाठी आलेला ११ कोटींचा निधी परत जाण्यास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर कारणीभूत असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक पदाचे उमेदवार संजू परब यांनी आज इथे केला. दरम्यान “वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष विकासकामे करू शकतात, तर सावंतवाडीचे का नाही? अशा लोकांनी पुन्हा सत्तेत येऊ नये. विकासासाठी व्हिजन लागते आणि ते आमच्याकडे आहे. सावंतवाडीकरांनी आमच्या उमेदवारांना साथ द्यावी.” असे आवाहन परब यांनी केले.

मोती तलाव मालकी प्रश्न: दोन दिवसांत पुरावे सादर करणार

ते म्हणाले, “तलाव हा सावंतवाडीकरांचा आहे आणि तो तसाच राहिला पाहिजे. शिंदे शिवसेना सत्तेत आल्याशिवाय हे शक्य नाही. दोन दिवसांत मी मोती तलाव प्रकरणाबाबत सर्व पुरावे जनतेसमोर मांडणार आहे.” असे परब यांनी बोलताना स्पष्ट केले.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा ‘अडथळा’ प्रश्नचिन्हात

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ४० कोटी रुपये आमदार दीपक केसरकर यांनी आणले पण ते देखील अडकून आहेत
“जर तुमच्याकडे खरोखर व्हिजन असेल तर जागा फुकट द्यावी. एवढ्या अटी-शर्ती घालून हॉस्पिटल कसे होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांकडून दोन हजार रुपये घेणाऱ्यांचा शहराचा विकास काय करणार, अशी टीकाही परब यांनी केली.

‘दीपक भाईंच्या नेतृत्वाखालीच विकास शक्य’

ते म्हणाले, “दीपक भाई आज आमदार आहेत आणि पुढील चार वर्षेही तेच विकास करणार. काही लोक तीन तारखेपर्यंत तुमच्याकडे येतील; त्यानंतर त्यांचे दर्शन होणार नाही. आपण जसे देवळातील विठोबाला नमस्कार करतो, तसेच खरे नेते ओळखले पाहिजेत.”
“दीपक भाईंच्या नम्रतेमुळे सावंतवाडी शांत आणि सुंदर राहिली आहे. काही अपप्रवृत्तीचे लोक सत्तेत आले तर ही शांतता बिघडेल. त्यामुळे जनतेने सावध राहून शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.” असे परब यांनी केले

You cannot copy content of this page