सावंतवाडी शहर सुंदर शांत राहिला पाहिजे,तर चांगल्या लोकांना सत्तेवर आणा …

आमदार दीपक केसरकर: मोती तलाव मल्टीस्पेशालिटी बाबत दिलेलं उदाहरण बरोबर,, सह्या झाल्या असत्या तर हॉस्पिटलच काम चार वर्षांपूर्वी सुरु झालं असतं..

⚡सावंतवाडी ता.२४-: “सावंतवाडी शहर सुंदर आहे, शांत आहे, आणि ही शांतता अशीच टिकली पाहिजे. त्यासाठी चांगल्या लोकांना सत्तेत आणा,” असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी येथे केले. “प्रत्येक जण उमेदवारी मागतो, परंतु सर्वांना उमेदवार देणे शक्य नसते. त्यामुळे राग मनात ठेवून चुकीच्या व्यक्तीला सत्ता देऊ नका; कारण येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विविध विकासकामांचा उल्लेख करताना आमदार केसरकर म्हणाले की, “मोती तलाव आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदाहरण संजू परब यांनी दिले ते योग्य आहे. टीका तर चालते, पण अडथळे न आणता सह्या झाल्या असत्या तर ही कामे चार वर्षांपूर्वीच सुरू झाली असती. बीओटीवर उभारला जाणारा एसटी स्टँड देखण्या रूपात लवकरच उभा राहणार आहे.”

सावंतवाडीच्या गती–वैभवासाठी आगामी काळ निर्णायक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आमच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा द्या आणि धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय मिळवून द्या.”

You cannot copy content of this page