दीपक केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना सावंतवाडीकरांनी जागा दाखवावी…

मंत्री उदय सामंत: संजू परबांना किती जरी टार्गेट केलं, तरी संजू परबांचा विजय आजच निश्चित आहे..

⚡सावंतवाडी ता.२४-: विरोधकांकडून आज माजी मंत्री दीपक केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सावंतवाडीकरांनी सतर्क राहून विरोधकांना योग्य जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिंदे शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी केले.शहरात आज आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते.

सामंत म्हणाले की, विरोधकांकडून संजू परब यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. मात्र कितीही डावपेच रचले तरी संजू परब यांचा विजय आजच निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page