विशाल परब: प्रभाग क्रमांक 9 मध्ये कॉर्नर सभा संपन्न..
⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी होणारी निवडणूक ही आमच्या प्रतिषठेची लढाई नसून एकतर्फी विजयाने आमची प्रतिष्ठा वाढविणारी आहे. तुम्ही आपल्या उमेदवारांसाठी पुढील 7 दिवस प्रचारात सक्रिय व्हा. मग भाजपा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार, असे प्रतिपादन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
वेंगुर्ला नगरपरिषद प्रभाग 9 मध्ये मधील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरप, नगरसेवक पदाचे उमेदवार युवराज जाधव व यशश्री नाईक यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी माजी नगराध्यक्ष दाजी परब,भाजपचे तालुका चिटणीस समिर कुडाळकर, विजय रेडकर, युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रा. हेमंत गावडे, रुपेश पावसकर, ओंकार पावसकर तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
