⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला शहरात शिंदे शिवसेनेने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे यांनी बऱ्याच प्रभागात प्रचारात सक्रिय होत आपल्यासोबत बहुसंख्य नगरसेवक निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. दरम्यान आज शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी गेल्या 4 वर्षात आ. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरासाठी केलेल्या विकासात्मक कामाबाबत सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. यावेळी शहरप्रमुख उमेश येरम, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, सुरु चव्हाण, सत्यवान साटेलकर, सुहास कोळसूळकर, अन्य 17 उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
वेंगुर्ला शहरात शिवसेनेचा झंझावती प्रचार…
