उदय नाईक:कोणीतरी मोठी हस्ती असल्यासारखे प्रत्येकाचा अपमान करतात..
⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी ही श्री देव पाटेकराची भूमी आहे, इथे अति तेथे माती नक्कीच होते. गेले काही दिवस सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब हे ज्या पद्धतीने अत्यंत गर्विष्ठ पद्धतीने वक्तव्य करीत आहेत, आपण कोणीतरी मोठी हस्ती असल्यासारखे प्रत्येकाचा अपमान करत आहे, हे सर्व पाहता त्यांना या गोष्टीचा प्रत्यय नक्की येईल. आणि जनता नक्कीच त्यांचा पराभव करेल, असे भाजपाचे उमेदवार उदय नाईक यांनी सांगितले.
श्री. नाईक वार्ड क्रमांक ७ मध्ये प्रचार करीत असताना बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांचा हात डोक्यावर आहे म्हणजे आपले कोणी काही करू शकत नाही, असे संजू परब यांना वाटते. पण इथे खुद्द दीपक केसरकर यांनीही नम्रपणा घेत कधी या मातीत आव्हानांची भाषा केली नाही. येणाऱ्या काळात संजू परबांना दिसून येईल की त्यांची भाषा आणि रग दोन्हीही मोती तलावात विसर्जित होईल. वार्ड क्रमांक ७ मधून त्यांना आम्ही लोकचं पराभवाची सप्रेम भेट देणार आहोत. त्यांनी ‘ह्याची देही ह्याची डोळा’ आपण या सावंतवाडीत कसे पराभूत होतो?, याचा स्वानुभव घेऊनच आपले दादागिरीचे राजकारण थांबवावे, असा सल्ला त्यांनी दिलाय.
