कुडाळ : येथील कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित मुंबई विद्यापीठ संलग्न संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे, कोकण विभागाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थित प्राध्यापक, प्रध्यापकेतर वर्गाशी संवाद साधला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांची महाविद्यालयास ही सदिच्छा भेट असल्याने त्यांनी थेट महाविद्यालयाच्या प्राध्यापकांशी संवाद साधत नवीन शैक्षणिक धोरणावर सकारात्मक चर्चा केली. विद्यार्थी केंद्रित शिक्षण असावे त्यासाठी येथील निसर्गरम्य कोकणातील संसाधनांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या क्षेत्रीय अभ्यासक्रमात कसा करता येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाविद्यालयाचे लक्षणीय शैक्षणिक उपक्रमांची माहिती प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे व प्रा.डॉ.ए.एन.लोखंडे, प्रा. डॉ.ए.के.पवार, प्रा.डॉ.आर.वाय.ठाकूर, प्रा.ए.एम.कानशिडे, प्रा.डॉ.वाय.जे.कोळी आदी प्राध्यापकांनी दिली. तर कार्यालयीन माहिती अधीक्षक एस.जे.कदम यांनी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्व, त्याची आवश्यक अंमलबजावणी आणि प्राध्यापकवर्गाची भूमिका या विषयांवर त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. प्राध्यापकांचा वाढलेला कार्यभार,नवीन अभ्यासक्रम,कर्मचाऱ्यांचे प्रश्न इत्यादींचा अगदी थोडक्यात डॉ. बोंदर यांनी आढावा घेतला. स्वगतानंतर सर्वप्रथम उपस्थितांनी आपला थोडक्यात परिचय करून दिला. महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.ए.एन.लोखंडे यांनी आभार मानले.
एसआरएम कॉलेजला डॉ. किरणकुमार बोंदर यांची सदिच्छा भेट…
