सौ. सिमरन चांदरकर व श्री. समीर चांदरकर यांची राष्ट्रीय समृद्धी स्पर्धेसाठी निवड…

⚡मालवण ता.२३-:
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय समृद्धी कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत कला एकात्मिक अध्यापन शास्त्र स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. सिमरन समीर चांदरकर सहाय्यक शिक्षिका व कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या दोन्हीही शिक्षकांची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

माध्यमिक स्तरावर समृद्धी स्पर्धा हा राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमचाच विस्तारीत कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये आयोजित (दुसरे वर्ष) केला आहे. या अंतर्गत शिक्षकांना माध्यमिक स्तरावरील (इयत्ता नववी ते बारावी) अभ्यासक्रमाच्या क्षेत्रांवर सर्वोत्तम कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धती (best art integrated pedagogical practices) यावर आधारित सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृतींच्या सादरीकरणाची संधी मिळते. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP- २०२०) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-२०२३) या नुसार अभ्यासक्रमीय अध्ययनामध्ये कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांचे योगदान ओळखणे आणि प्रोत्साहित करणे हा हेतू आहे. श्री. समीर चांदरकर व सौ. सिमरन चांदरकर यांनी या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पिंगुळी येथील कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून इयत्ता नववीचा कि मिथ्या? किं वास्तवम? हा पाठ सादर केला.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागातून १५ गट सहभागी झालेले होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. तापकीर सर, डॉ. इसावे मॅडम डॉ. सुवर्णा भुजबळ यांनी केले. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड. एस. एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव, एस. डी. गावडे, खजिनदार रवींद्र पावसकर शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ सदस्य प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे पर्यवेक्षक महेश भाट सर्व शिक्षक शिक्षिका यांनी सौ. सिमरन चांदरकर व समीर चांदरकर यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page