कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक प्रचाराला वेग आला असून भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचार कार्यालयांची सुरूवात करण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीनुसार प्रभाग क्रमांक १७ मधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष व प्रभाग १७ चे उमेदवार अबीद नाईक, भाजप–राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक बाबू गायकवाड, शिवसुंदर उर्फ गजा देसाई यांच्यासह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभागातील विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि युती उमेदवारांच्या विजयासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.
