कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला मत द्या – समीर नलावडे…

कणकवली : गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकालात कणकवली शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली असून रिंगरोड, गणपती साना–जाणवली जोडणारा पूल, कृत्रिम धबधबा यांसह रखडलेल्या प्रश्नांना दिशा देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम सुरू आहे. “भाजपाला मत म्हणजे विकासाला मत,” असे प्रतिपादन भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी व्यक्त केले.

प्रभाग क्र. ५ मध्ये भाजपातर्फे घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. या प्रचार फेरीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, नगरसेवक पदाच्या उमेदवार मेघा गांगण, बँक संचालिका प्रज्ञा ढवण, शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर, राजू गवाणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, अजय गांगण, निखिल आचरेकर, सचिन गुरव, गंगाराम सावंत, संजना सदडेकर, सुप्रिया पाटील, प्रियाली कोदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रचारादरम्यान भाजप सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना देत जनजागृती करण्यात आली. आगामी नगरपंचायत निवडणुकीत कणकवली शहरातील सुज्ञ जनता विकासाच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

You cannot copy content of this page