कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा आता अधिकच घमघमाटात जात असून राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढू लागला आहे. वातावरण तापू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील पूर्णपणे सतर्क झाले आहे.
कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळी शहरात पायी पेट्रोलिंग करण्यात आले.
यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, हवालदार पांडुरंग पांढरे, स्टायकिंग पथकासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
निवडणूक कालावधीत शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा भाव निर्माण व्हावा यासाठी हे पेट्रोलिंग करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
