सावंतवाडी दि. २३:- शिरशिंगे गोठवेवाडी येथील रहिवासी रावजी लाडू घावरे वय ६५ याचे काल दुपारी त्यांचे सबनीसवाडा बिरोडकर टेब येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी कृषी पर्यवेक्षक म्हणून ३७ वर्षे सेवा बजावली होती
त्यांच्या पश्चात दोन मुलगे व दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते गेले अनेक वर्षे बिरोडकर टेब येथे वास्तवयास होते. लोकमान्य मल्टिपर्पज कॉ. सोसायटी चे कर्मचारी शुभम घावरे यांचे ते वडील होत.
निवृत्त कृषी पर्यवेक्षक रावजी घावरे यांचे निधन.
