⚡मालवण ता.२३-:
मनसे पक्षाचे माजी मालवण शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी विशाल ओटवणेकर यांच्यासह आनंद धुरी, महेश गावडे, प्रतीक ओटवणेकर, प्रशांत प्रभू, वैष्णवी ओटवणेकर, नेहा हळदणकर आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांचे विकासकार्य व मालवण शहर विकासाचा दृष्टिकोन ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला, असे विशाल ओटवणेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
