शहरातील १० ही प्रभागातील शेकडो जणांनी युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा घेतला हाती…

⚡सावंतवाडी ता.२२-: नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील १० ही प्रभागातील शेकडो जणांनी युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला. भाजप नेत्यांवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. परब म्हणाले, सावंतवाडीचा निकाल भाजपच्या बाजूने लागेल. भाजपवर प्रेम करणारी माणसं तळकोकणात आहेत. भाजपचा कार्यकर्ता पेटुन उठतो तेव्हा काय होतं हे निकालात दिसून येईल. सावंतवाडीची स्पर्धा पुणे, बारामतीशी आहे‌. सावंतवाडीत राहून इथल्या लोकांची सेवा करण हेच माझं धैय्य आहे. सावंतवाडी, वेंगुर्लेत चांगलं हॉस्पिटल आणावं आम्ही तुमच स्वागत करतो अस आवाहन त्यांनी केल. यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, गुरूनाथ पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विशाल परब यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व प्रभागातील नागरिकांसह सर्वपक्षीयांनी प्रवेश केला. यात संतोष तळवणेकर, शिवा गावडे, ज्ञानेश्वर पारधी, निजान मुल्ला, नजमीन मुल्ला आदींसह १० ही प्रभागातील शेकडो जणांनी पक्षप्रवेश केला. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, माजी सभापती प्रमोद कामत, गुरूनाथ पेडणेकर, सौ. वेदीका परब, माजी नगरसेवक राजू बेग, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, अमित परब, हितेन नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page