प्रभाग १० मध्ये ‘त्रिमूर्ती’च्या जोरावर अनिल निरवडेकर यांचा विजयाचा आत्मविश्वास वाढला…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार अँड. अनिल निरवडेकर यांना मोठी ताकद मिळाली आहे. निरवडेकर यांचे जिगरी मित्र विनोद राऊळ तसेच बांदा येथील माजी सरपंच अक्रम खान यांनी त्यांच्यासोबत येत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून, या त्रिकुटाच्या एकजुटीमुळे भाजपचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरात आता ‘त्रिमूर्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तिघांच्या मैदानात उतरल्याने प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. राऊत आणि खान यांच्या जोडण्यामुळे निरवडेकर यांचे जनसंपर्क अधिक वेगाने वाढत असून, भाजपचे ‘कमळ’ फुलण्याच्या चर्चा परिसरात जोर धरत आहेत.

स्थानिक नागरिकांमध्येही या तिघांच्या एकत्रित प्रचाराबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, निवडणुकीत त्याचा किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page