मालवणमध्ये भाजप उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार…

मालवण दि प्रतिनिधी
मालवणच्या समुद्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर परप्रांतीय मच्छिमारी बाबत राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कडक पावले उचलली. गेल्या अकरा महिन्यात बेकायदेशीर मच्छीमारी बाबत जी धडक मोहीम राबविली गेली त्यामुळे अनधिकृत मछिमारीला चाप बसला आहे. या अनधिकृत मच्छीमारीच्या विरोधात कारवाई करणे सोपे जावे यासाठी ड्रोन च्या साहाय्याने लक्ष ठेवून गस्ती नौके द्वारे बेकायदेशीर मच्छिमारीवर कारवाई केली जात आहे. लवकरच या बेकायदेशीर मच्छिमारीच्या विरोधात स्टीलच्या गस्तीनौका सिंधुदुर्गांत दाखल होणार आहेत त्यामुळे आज जे विरोधक बेकायदेशीर मच्छिमारी बाबत जी ओरड मारत आहेत ती फुकाची आहे, असे रोखठोक प्रतिपादन मालवण प्रभाग ९ ब च्या भाजपाच्या उमेदवार सौ. अन्वेषा आचरेकर यांनी मतदारांशी संवाद साधताना केले.

मालवण शहर प्रभाग ९ अ चे भाजपचे उमेदवार सन्मेष परब आणि ९ ब च्या उमेदवार अन्वेषा आचरेकर यांनी भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ शिल्पा खोत यांच्या समवेत तसेच आपल्या कार्यकर्त्यांसमवेत दांडी भागात डोअर टू डोअर प्रचार केला.

यावेळी बोलताना अन्वेषा आचरेकर म्हणाल्या, मच्छिमारी व्यवसायाला जोडधंदा म्हणून अलीकडच्या काळात मालवण मध्ये पर्यटन उद्योग उभे राहात आहेत. दांडी भागात तर होम स्टे, हॉटेल्स, जलक्रीडा व्यवसाय आणि तत्सम पर्यटनाशी निगडित असणाऱ्या उद्योगांना बहर आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तसेच खासदार नारायण राणे यांनी या भागातील तरुणांना काम मिळाले पाहिजे म्हणून पर्यटन उद्योगातून अनेक संधी निर्माण करून दिल्या आहेत. यासाठी शासकीय योजनाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या. सिंधुरत्न सारखी योजना भाजप सरकारने राबवली आहे. त्याचा अनेकांनी फायदा घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरील निवडणुकीत इथला मतदार भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे सांगून त्या म्हणाल्या, दांडी येथील मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक यांचे प्रलंबित प्रश्न पालकमंत्री राणे यांच्या माध्यमातून सोडविले जातील. येथील तरुणांना इथेच कसा रोजगार. मिळेल, यासाठी ते प्रयत्नशील आहोत. बंधाराकम रस्ता सुद्धा पूर्ण होणार आहे. दांडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्याचा रोजगार दृष्टीने स्थानिकांना बचत गटांना फायदा होण्यासाठी खाऊ गल्लीसारखी संकल्पना मंत्री राणे यांच्याकडे आहे. किनाऱ्यावर बचत गट महिलांना स्टॉल लावून रोजगार उपलब्ध होणार आहे. मच्छीमारांच्या हितासाठी अनेक निर्णय राणे यांनी घेतले आहेत. मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. नेहमीच ते मच्छीमारांच्या पाठिशी राहिलेत असेही त्या म्हणाल्या

केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पालकमंत्री भाजपचे आहेत. खासदार नारायण राणेही दांडीच्या विकासासाठी मोठा निधी देणार आहेत. त्यामुळे जनतेने भाजपच्या पाठिशी राहावे, असे आवाहन प्रभाग क्रमांक ९ च्या भाजप उमेदवार अन्वेषा आचरेकर व सन्मेश परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page