सावंतवाडी : शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मठकर यांनी झंझावाती प्रचारास सुरुवात केली आहे. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार चंद्रशेखर सुभेदार व अफरोज राजगुरू यांच्यासमवेत त्यांनी घरोघरी प्रचार केला.
कार्यकर्त्यांची साथ, जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि आशीर्वाद आम्हाला मिळत आहे. या प्रभागातून मोठ मताधिक्य आम्हाला मिळेल असा विश्वास सीमा मठकर यांनी व्यक्त केला.
