⚡मालवण ता.२२-:
विचार करा… मतदान करा… लोकशाहीच आपला आधार… माझे मत… माझी ताकद… अशा घोषणा देत मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मालवण नगरपालिकेतर्फे मालवण शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
मालवण नगरपालिका येथून निघालेली ही मतदार जनजागृती रॅली भरड मार्गे बाजारपेठेतून फोवकांडा पिंपळापार येथून पुन्हा नगरपालिका कार्यालयाकडे विसर्जित झाली. या रॅलीमध्ये मालवण नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील, मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक थोरात यांच्यासह नगरपालिका अधिकारी वं कर्मचारी तसेच स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे एनएसएस व एनसीसी विद्यार्थी, भंडारी ए. सो. हायस्कुल व टोपीवाला हायस्कुलचे विद्यार्थी, शिक्षक आदी सहभागी झाले होते.
