दीपक केसरकरांनी विजयासाठी कंबर कसली…

ठिकठिकाणी जोरदार सुरू आहे प्रचार: नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद..

सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांनी कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे‌.

सालईवाडा भागात त्यांनी आज बैठका घेत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. यावेळी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येत पुन्हा एकदा सावंतवाडी इतिहास रचेल असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर, पक्षाचे उमेदवार खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, पुजा आरवारी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक अण्णा देसाई, सुधीर धुमे, संतोष मठकर, प्रसाद माधव आदींसह नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page