⚡सावंतवाडी ता.२२-: अपक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आज सावंतवाडी शहरात जोरदार प्रचार केला. यावेळी त्यांच्यासोबत अखिलेश कोरगावकर; ऐश्वर्या कोरगावकर, व्यंकटेश शेठ, अवधूत नाटेकर, विनिता एलिडा डिसोजा, शितल डिसोजा, आदींनी प्रचारात सहभाग घेतला.
कोरगावकर म्हणाल्या, लोकांच्या भेटीगाठी आम्ही घेत आहोत. लोक सांगत असलेल्या समस्या ऐकत आहोत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा भर असणार आहे. प्रचाराला चांगला प्रतिसाद ठाकरे आम्हाला मिळत आहे. त्यामुळे माझा विजय मोठ्या मताधिक्याने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
