राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश…

आमदार निलेश राणेंनी केले स्वागत..

कणकवली : कणकवली शहरातील राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कणकवली येथे शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. प्रवेशकर्त्यांचे आमदार राणे यांनी पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी पक्षाचे निखिल गोवेकर, आदिनाथ चव्हाण, श्रीधर सावंत, मेहबुक लदाफ, हर्ष पाताडे, हर्षद पवार, भावेश चव्हाण, अमोल भोगटे आणि मनीष सावंत यांनी शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार राजन तेली, शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page