अँड अनिल निरवडेकर: प्रचाराचा केला उत्साहात शुभारंभ..
⚡सावंतवाडी ता.२०-: भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार वीणा विलास जाधव व अनिल कृष्णा निरवडेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज उत्साहात संपन्न झाला. प्रारंभापासूनच कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीसह विजयाच्या घोषणा देत प्रचाराला जोशपूर्ण सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना अनिल निरवडेकर म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणें व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक कामांच्या जोरावर आम्ही निश्चितच शहरात बाजी मारू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचाराच्या या शुभारंभी कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
