‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जनजागृतीसाठी सावंतवाडीत बाईक रॅली…

⚡सावंतवाडी, ता.०९-: जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत अभय केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त बाईक रॅली काढून समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत व संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्रीमती दिपाली भालेकर, तालुका संरक्षण अधिकारी श्री. पुरुषोत्तम पाटील, सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या पीएसआय श्रीमती माधुरी मुळीक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सावंतवाडीच्या श्रीमती घाडीगावकर व श्रीमती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस, सावंतवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा महिला व बालविकास विभाग सिंधुदुर्गचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या थीमवर आधारित ही बाईक रॅली सावंतवाडी पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन सावंतवाडी नगरपरिषदपर्यंत काढण्यात आली. या रॅलीद्वारे मुलींचे शिक्षण, सन्मान आणि संरक्षण याबाबत समाजात जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

You cannot copy content of this page