⚡मालवण ता.१०-:
श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा च्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत आचरा देऊळवाडी येथील सौ. मधुरा महेश परब या विजेत्या ठरल्याने पैठणीच्या मानकरी तर आचरा देऊळवाडी येथील सौ. राधा गोविंद राणे या उपविजेत्या उप विजेत्या सौ. राधा गोविंद राणे या सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या.
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार आठ मार्च रोजी संस्थेच्या सभासद सौभाग्यवतींसाठी होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते.स्पर्धेचा शुभारंभ नुतन जिल्हा परिषद सदस्य सौ वर्षा सांबारी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, त्रिंबक वाचनालयाचे सुरेंद्र सकपाळ, रामेश्वर वाचनालयाच्या उर्मिला सांबारी, श्रीमती वैशाली सांबारी, भिकाजी कदम,,ग्रंथपाल विनिता कांबळी,सौ वैशाली देसाई, सौ.अनिता आचरेकर,भावना मुणगेकर
आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबई विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविलेल्या आचरा कालेजच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
होममिनिस्टर स्पर्धा ५ फेऱ्यांमध्ये घेण्यात आली पहिल्या फेरीपासूनच आकर्षक बक्षिसे देण्यात आली.. उपस्थित प्रेक्षक वर्गासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. अचूक उत्तर देणाऱ्या प्रेक्षकासाठी तर उपस्थित विद्यार्थी वर्गासाठीही प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. त्यातील १० विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या गेल्या.तर सर्व सहभागी ३२ स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. स्पर्धा यशस्वितेसाठी वाचन मंदिरचे महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण, सांस्कृतिक समिती सदस्या भावना मुणगेकर,कामिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी, यांनी विशेष परिश्रम घेतले.
