दिपाली भालेकर: प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपच्या माध्यमातून सुरु आहे जोरदार प्रचार..
⚡सावंतवाडी, ता.२०-: आम्हाला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या जोरावर आम्ही मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास भाजपचे उमेदवार राजू बेग व दीपाली भालेकर यांनी व्यक्त केला.
प्रचार फेरीदरम्यान दोन्ही उमेदवारांनी स्थानिक मतदारांशी संवाद साधताना पक्षाच्या वतीने प्रभागात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख केला. “भाजपच्या माध्यमातून या भागात रस्ते, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांवर भर देत अनेक कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे जनतेचा वाढता पाठिंबा आम्हाला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देईल,” असेही त्यांनी सांगितले.
मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आगामी निवडणुकीत व्यापक मताधिक्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला.
