वेरली सातेरी पंचायतन परिक्रमा सोहळा उद्या पासून…

⚡मालवण ता.२०-:
मालवण तालुक्यातील वेरली (वेरळ) येथील 84 खेड्यांची अधिपती श्रीदेवी सातेरी पंचायतन परिक्रमा सोहळा शुक्रवार दिनांक 21 ते मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
यानिमित्त शुक्रवार दिनांक 21 रोजी दुपारी सातेरी मंदिरात देवतरंग सजवणे, सायंकाळी सातेरी पंचायतन देवतरंगासह श्री देव गांगेश्वर मंदिर येथे प्रस्थान करणार आहेत. शनिवार दिनांक 22 रोजी श्री देव गांगेश्वर मंदिर येथे महाप्रसाद होणार आहे. यानंतर देवता पंचायतन सायंकाळी श्री देव रवळनाथ मंदिर चव्हाटा राय येथे प्रस्थान करणार आहेत. तसेच रात्रौ 10 वाजता श्री. देव रवळनाथ येथे बाळकृष्ण गोरे दशावतार कंपनीचे दशावतारी नाटक होणार आहे. रविवार दिनांक 23 रोजी रवळनाथ मंदिर येथे महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर देवता पंचायतन सायंकाळी विठ्ठलादेवी देवस्थान येथे प्रस्थान करणार असून विठ्ठलादेवी देवस्थान येथे मुक्कामी राहणार असून सोमवार दिनांक 24 रोजी श्रीदेवी विठ्ठलादेवी देवस्थान येथे महाप्रसाद होणार आहे. यानंतर सायंकाळी देवता पंचायतन देवतरंगासह सातेरी मंदिरात प्रस्थान करणार आहेत. मंगळवार दिनांक 25 रोजी श्रीदेवी सातरी मंदिर येथे महाप्रसाद होणार असून पाच दिवसाच्या या वार्षिक परिक्रमा सोहळ्याची विधिवत संगता होणार आहे तरी वेरळ गावातील ग्रामस्थ, महिला, माहेरवासीनी, तथा पंचक्रोशीतील भाविकांनी संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ वेरली (वेरळ) यांनी केले आहे.

You cannot copy content of this page