बचत गटांच्या सीआरपींना प्रचार फेऱ्यांमध्ये जबरदस्तीने येण्यासाठी दबाव टाकला जातोय…

पुनम चव्हाण: अशा प्रकारचा दबाव शिंदे शिवसेना खपवून घेणार नाही..

⚡मालवण, ता.२०-: मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात सध्या खेळीमेळीचे वातावरण असताना भाजप सह अन्यविरोधकांकडून बचत गटांच्या सीआरपीना बैठकांना उपस्थित राहण्यासाठी प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप शिंदे शिवसेना शहरप्रमुख पूनम चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला मालवण पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कोणत्याही बचत गटांच्या सीआरपी वर महिलांवर सर दबाव टाकला जात असेल तर शिंदे शिवसेनेच्या महिला हे खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
येथील शिंदे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममता वराडकर, नीना मुंबरकर, स्नेहा घाडीगावकर, तालुका समन्वयक प्रियांका मेस्त्री, उपतालुकाप्रमुख पूजा तोंडवळकर, कुडाळ महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, प्रतिमा भोजने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. चव्हाण म्हणाल्या, मालवण पालिकेची निवडणूक शांततेत सुरू आहे. अशा परिस्थितीत बचतगटांच्या प्रमुख आलेल्या सीआरपी यांना महिलांना प्रचारफेऱ्या, बैठकांना उपस्थित राहण्यासाठी भाजपसह अन्य पक्षांकडून दबाव टाकला जात आहे. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. त्यामुळे असे प्रकार आढळून आल्यास त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल.
मालवण शहरात सुशिक्षित नागरिक आहेत. त्यामुळे ही जनता शहराच्या विकासासाठी शिवसेनेला मतदानरुपी आशीर्वाद देतील. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचे हात बळकट झाल्यास शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहील. मतदारांनी शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांच्यासह सर्व २० नगरसेवकांना निवडून दिल्यास आमदार राणेंच्या ताकदीला अधिक ताकद देऊ आणि शहराचा विकास शंभर टक्के करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ हा रामेश्वर मंदिरात भ्रष्टाचार मुक्त मालवण पालिकेची शपथ घेतली आहे. पालिका हे एक मंदिर आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा, शहराचा विकास करण्यासाठी तेथे आम्ही निवडून जाणार आहोत. त्यामुळे घेतलेल्या शपथ मालवण वासियांचा विश्वास म्हणून जपणार आहोत. त्यामुळे या निवडणुकीत मालवणवासी यांचे मतदान रुपी आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील आणि मालवण पालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकेल असा विश्वासही सौ. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page