भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकदिलाने काम करा : प्रदेशाध्यक्ष ना. रवींद्र चव्हाण…

⚡वेंगुर्ला ता.२०-: भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार यांनी एकदिलाने प्रचारात उतरून काम करा. भाजपने केलेले काम नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले येथे केले. वेंगुर्ले भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांशी चर्चा करून प्रचाराचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी,भाजपा युवा नेते विशाल परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप, साईप्रसाद नाईक, जयंत मोंडकर, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, नगरसेवक पदाचे उमेदवार मंजुषा आरोलकर, रवी शिरसाट, गौरी माईणकर, प्रीतम सावंत, विनायक गवंडळकर, गौरी मराठे,आकांक्षा परब, तातोबा पालयेकर, सुषमा प्रभूखानोलकर, विनय नेरूरकर, रिया केरकर, सदानंद गिरप, काजल गिरप, सचिन शेट्ये, श्रेया मयेकर, प्रसाद गुरव, युवराज जाधव, यशस्वी नाईक, प्रणव वायंगणकर, शीतल आंगचेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page