खासेवाडी तिरोडा येथे श्री सत्यनारायण महापूजा…

⚡सावंतवाडी ता.२०-: येथे येत्या शनिवार, दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ र.भोंसले परिवारातील ज्येष्ठ व नातू–नातीनिमित्त आनंदसोहळा म्हणून आयोजित करण्यात आला आहे.या प्रसंगी चि. ऋषिकेश जयसिंगराव पवार व चि. सौ. का. गायत्रीदेवी यादव यांच्या विवाहानिमित्त नवदांपत्यास शुभेच्छा व आशीर्वाद मिळावा, तसेच कुटुंबियांच्या वतीने सत्कार कार्यक्रम पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे —

सकाळी ९.३० वा. : आरती

सायं. ७.३० वा. : श्री देव पाटकर तरुण भजन मंडळ, खासेवाडी व तिरोडा यांच्या भजनाचा कार्यक्रम

सायं. ५ ते ८ वा.

तीर्थप्रसाद व स्वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन श्री देव पाटकर तरुण मंडळ व ग्रामस्थ खासेवाडी, तिरोडा यांच्या वतीने केले आहे. स्थळ: श्री देव पाटकर देवस्थान, खासेवाडी, तिरोडा आहे.तर या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून नवदांपत्यास आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page