अबिद नाईक यांची प्रचारात आघाडी:उमेदवारीला स्थानिक नेत्यांचा सक्रीय पाठिंबा:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,बाबू गायकवाड,गजा देसाई,सुरेश सावंत,संदीप सावंत,अभि मुसळे,मिलिंद मेस्त्री,स्वप्नील चिंदरकर यांनी घातले विजयासाठी साकडे..
⚡कणकवली ता.२०-:
कणकवली शहरातील महापुरुष देवालय येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी श्रीफळ वाढवून आगामी कणकवली नगरपंचायत निवडणूक 2025 च्या प्रचाराला विधिवत प्रारंभ केला.नगरपंचायत प्रभाग क्रमांक 17 मधून अबिद नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारीने स्पर्धेत आहेत.
स्थानिक पातळीवर लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणारा नेता म्हणून अबिद नाईक यांची ओळख दृढ झाली आहे.त्यामुळे प्रभाग 17 मधील नागरिक त्यांना भक्कम साथ देत असून,त्यांच्या उमेदवारीबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.प्रचंड बहुमताने विजय मिळावा यासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,तसेच भाजपा कार्यकर्ते गजा देसाई,माजी नगरसेवक बाबू गायकवाड,भाजपाचे जेष्ठ नेते सुरेश सावंत,वागदे सरपंच संदीप सावंत,भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री या नेत्यांनीही महापुरुष देवस्थान येथे विजयासाठी साकडे घातले.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीची रंगत वाढवणारा हा प्रचाराचा शुभारंभ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत असून,प्रभाग क्रमांक 17 मध्ये अबिद नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
प्रसंगी कणकवली माजी नागराध्यक्ष समीर नलावडे,माजी नगरसेवक बाबू गायकवाड, भाजपा कार्यकर्ते शिवसुंदर उर्फ गजा देसाई,माजी उपसरपंच कलमठ स्वप्नील चिंदरकर,समर्थ कोरगावकर,माजी नगरसेवक अभि मुसळे,भाजपा नेते सुरेश सावंत,महिला कार्यकर्त्या संजीवनी पवार,राष्ट्रवादी जेष्ठ नेते सावळाराम अनावकर गुरुजी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी जिल्हा सदस्य सतीश पाताडे,राष्ट्रवादी जेष्ठ कार्यकर्ते राजू पाताडे,राष्ट्रवादी जेष्ठ नेते विलास गावकर,राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले,जिल्हा प्रधिनिधी सचिन अडुलकर,जहीर फकीर,सुभाष चव्हाण,तेजस येरम,अच्युतराव घाडीगावकर,नागेश चव्हाण,निलेश पेडणेकर,पांडुरंग हळवे,संतोष आरोंदेकर,मनोहर सावंत,ज्ञानदेव हळवे,प्रज्ञेश उर्फ सोनू निग्रे,शुभांगी नार्वेकर, शीतल लांबर, सुरेखा चव्हाण,साक्षी तर्फे,सुनीता पाटील,जुईली निग्रे, साक्षी आरोंदेकर तसेच मोठ्या संख्येने भाजपा राष्ट्रवादी युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
