“आजपासून प्रत्येकजण संदेश पारकर आहे!”,आमदार निलेश राणेंची गर्जना..
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एका मंचावर येण्यामागे कारण म्हणजे शहरासमोरील प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवणे आणि विकासाला गती देणे, असे मत शिवसेना (शिंदेगट) कुडाळ – मालवण चे आमदार आणि स्टार प्रचारक आ. निलेश राणे यांनी व्यक्त केले. कणकवली शहर राजकारणातील “नाक” असून आज शहराला स्थिरता आणि शांततेची गरज आहे. लोकांच्या व्यथा मिटवण्यासाठी शहर विकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन देखील आ. निलेश राणे यांनी केले.
कणकवली येथे माजी आम. राजन तेली यांच्या निवासस्थानी आयोजित शहर विकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, सतीश सावंत, संजय आग्रे, नागेश मोरये यांच्यासह शहर विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. निलेश राणे म्हणाले, नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या खात्यामार्फत कणकवलीला आवश्यक तेवढा निधी मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संदेश पारकर हे जिद्दी नेतृत्व आहे. पराभवानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा निवडणुकीत उभे राहून कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आहे. संदेश पारकर यांना विजयी करण्यासाठी वाटेल ते करू परंतु कुठेही कमी पडणार नाही. शहर विकास आघाडी तयार होताना अनेकांनी पदांचा त्याग केला. ही परिस्थिती का निर्माण झाली, याचा विचार करण्यासारखा आहे. आजपासून प्रत्येक माणूस हा संदेश पारकर आहे हे लक्षात ठेवा. मी तुमच्या सोबत आहे. कोनीही आला फक्त एक फोन करा … येण्याची शक्यता नाहीय. मालवण, वेंगुर्ला, सावंत नगरपंचायतवर झेंडे आपलेच लागणार आहेत.
दहा वर्षाच्या पराभवानंतर निलेश राणे एकटे जिंकलेले नाहीत. जेवढी चीड माझ्या मनात होती तेवढीच चीड माझ्या सहकाऱ्यांच्या मनात होती की, माझा माणूस हरला. माझ्या माणसांनी जे जे केलं त्या प्रयत्नांनी निलेश राणे जिंकून आमदार झाले. एकटे जिंकून आमदार झाले नाहींयत. कितीही पैश्याचा वापर होउदे माणसात जिद्द असली की माझाच माणूस जिंकला पाहिजे हे जो पर्यंत आपण घराघरा पर्यंत पोहोचत नाही, लोकांना विश्वासात घेऊन जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे सोप्प नाहीय. शहरविकास आघाडी हा आमचा पक्ष अस समजुम काम करून लोकांच्या मनात घर केलं पाहिजे. लोकांमध्ये आमच्या आघाडीबद्दल सहानुभूती आहे. शहरात झेंडा हा शहर विकास आघाडीचाच लागला पाहिजे. ३डिसेंबर ला गुलाल आपलाच उधळला गेला पाहिजे, असेही आम. निलेश राणे यांनी उपस्थित शहरविकास आघाडीच्या उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित केले.
यावेळी संदेश पारकर, सतीश सावंत व माजी आम. राजन तेली यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
