इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचे सहकार्य:कुडाळ हायस्कूलच्या 900 विद्यार्थी व 25 शिक्षकांचा सहभाग..
⚡कुडाळ ता.१९-: ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ, इनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 व रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू यांचे संयुक्त आयोजित “विज्ञान रथम” उपक्रमांतर्गत कुडाळ हायस्कूल कुडाळ मधील 900 विद्यार्थांना व 25 शिक्षकांना विज्ञान विषयक विविध प्रयोग, विज्ञान विषयक माहिती मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षा सौ सानिका मदने, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ सायली प्रभू,सौ ऋतुजा परब, सौ स्वप्नाली साळगावकर, रोटरी क्लब ऑफ विरूधम तामिळनाडूचे समन्वयक नवीनकुमार ,कुडाळ हायस्कूल चे मुख्याध्यापक बिपिन वराडे, उपमुख्याध्यापक प्रविण भोगटे, पर्यवेक्षक रंजन तेली व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील, रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू, रोटरी डिस्ट्रिक्ट 3212 मधील इधयम ट्रस्ट यांचे योगदान अनमोल असल्याने कुडाळ हायस्कूल कुडाळ मधील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या 900 विद्यार्थी व 25 शिक्षकांना मोफत लाभ देता आला. तसेच 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर कालावधीत हा विज्ञान रथ कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, केरळ मधील ग्रामीण भागातील शाळांना भेटी देणार असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी केले.
इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांनी “विज्ञान रथम ” या प्रोजेक्ट ची गोवा, कर्नाटक महाराष्ट्र मधील ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 ची प्रोजेक्ट चेअरमनपदी माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ सायली प्रभू यांची निवड केली आहे.
हा प्रोजेक्ट तामिळनाडूतील रोटरी क्लब ऑफ विरूधनगर या क्लबने इधयम सेवाट्रस्ट मार्फत दक्षिण भारतातील हजारो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीना विज्ञान विषयक विशेष रूची वाढावी या उद्देशाने मोफत कार्यक्रम घेण्याची कामगिरी केली आहे. यामुळेच इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांनी ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 मधील सर्व ईनरव्हिल क्लब ना विज्ञान रथम उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळा निवडण्याचे आवाहन केले होते.
हा विज्ञान रथ रत्नागिरी मध्ये लोटे, चिपळूण, खेड, येथे कार्यक्रम करून कुडाळ मध्ये दाखल झाला असून कुडाळ मध्ये न्यू शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा व कुडाळ हायस्कूल कुडाळ या दोन शाळांची निवड करण्यात आली. पुढील एक दिवस हा विज्ञान रथ सावंतवाडीत थांबणार असून नंतर गोव्यातील शाळांना दाखवणार आहेत. 6 डिसेंबर पर्यंत हा विज्ञान रथम कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, केरळ आदी राज्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाणार असल्याची माहिती डाॅ सायली प्रभू यांनी यावेळी दिली.
इनरव्हीलच्या विज्ञान रथम बसने आतापर्यंत 3883 किमी चा प्रवास करत 78 दिवसात 134 शाळांमधील 43,875 विद्यार्थी व 1762 शिक्षकांना विज्ञान विषयक जनजागृतीपर माहितीचा लाभ दिला आहे.
