विज्ञान रथम कार्यक्रम प्रेरणादायी…

कुडाळ: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळचा विज्ञान रथम कार्यक्रम प्रेरणादायी असून ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील, रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू, रोटरी डिस्ट्रिक्ट 3212 मधील इधयम ट्रस्ट यांचे योगदान अनमोल असल्याचे प्रतिपादन ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी केले. ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ, इनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 व रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू यांचे संयुक्त आयोजित “विज्ञान रथम” उपक्रमांतर्गत न्यू शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा कुडाळ येथील 700 विद्यार्थांना व 40 शिक्षकांना विज्ञान विषयक विविध प्रयोग, विज्ञान विषयक माहिती मार्गदर्शन करण्यात आले, त्यावेळी सौ. मदने बोलत होत्या.
यावेळी ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षा सौ सानिका मदने, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ सायली प्रभू, रोटरी क्लब ऑफ विरूधम तामिळनाडूचे समन्वयक नवीनकुमार व सहकारी,न्यू शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठाचे संस्था चेअरमन श्री आपासाहेब गावडे ,सचिव नागेंद्र परब सचिव ,संचालक एम एस पाटील ,पर्यवेक्षक मिलिंद कर्पे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ चा विज्ञान रथम कार्यक्रम प्रेरणादायी असून ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील, रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू, रोटरी डिस्ट्रिक्ट 3212 मधील इधयम ट्रस्ट यांचे योगदान अनमोल असल्याने न्यू शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठामधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या 700 विद्यार्थी व 40 शिक्षकांना मोफत लाभ देता आला असे गौरवोद्गार इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी व्यक्त केले.
इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांनी “विज्ञान रथम ” या प्रोजेक्ट ची गोवा, कर्नाटक महाराष्ट्र मधील ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 ची प्रोजेक्ट चेअरमनचा बहुमान दिल्याने विशेष आनंद होत आहे असे गौरवोद्गार माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ सायली प्रभू यांनी व्यक्त केले. हा प्रोजेक्ट तामिळनाडूतील रोटरी क्लब ऑफ विरूधनगर या क्लबने इधयम सेवाट्रस्ट मार्फत दक्षिण भारतातील हजारो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीना विज्ञान विषयक विशेष रूची वाढावी या उद्देशाने मोफत कार्यक्रम घेण्याची कामगिरी केली आहे. यामुळेच इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांनी ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 मधील सर्व ईनरव्हिल क्लबना विज्ञान रथम उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळा निवडण्याचे आवाहन केले होते. हा विज्ञान रथ रत्नागिरी मध्ये लोटे, चिपळूण, खेड, येथे कार्यक्रम करून कुडाळ मध्ये दाखल झाला असून कुडाळ मध्ये न्यू शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा व कुडाळ हायस्कूल कुडाळ या दोन शाळांची निवड करण्यात आली. पुढील एक दिवस हा विज्ञान रथ सावंतवाडीत थांबणार असून नंतर गोव्यातील शाळांना दाखवणार आहेत. 6 डिसेंबर पर्यंत हा विज्ञान रथम कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, केरळ आदी राज्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाणार असल्याची माहिती डाॅ सायली प्रभू यांनी यावेळी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग दाखवितानाच वैज्ञानिक अभिरूची निर्माण करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक करिअर घडविण्याचे प्रेरणादायी कार्य इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या विज्ञान रथम उपक्रमांतून जाणवते असे प्रतिपादन पालक व संस्था पदाधिकारी यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page