कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाची ज्योत प्रज्वलित व्हावी, जिज्ञासा वाढावी ,शोधक वृत्ती वाढावी यासाठी एका विशेष कार्यक्रमात टिम ए.एस.व्ही. कन्सल्ट प्रा.लि.चे चेअरमन ए. एस. विश्वनाथन यांनी उद्योग ऑटोमेशनसाठी उपयुक्त असे अत्याधुनिक आय.ओ.टी. आधारित उपयुक्त असे किट महाविद्यालयाला भेट दिले आहे.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश बागल (सीनियर आय.टी.कन्सल्टंट), धिरेन्द्र शिरधनकर (उत्कर्ष फाउंडेशन), क.म.शि.प्र.मंडळाचे सहसचिव महेंद्र गवस, प्रभारी प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे, तसेच भाईसाहेब तळेकर, प्रा.प्रशांत केरवडेकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी बोलताना किंवा विचार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश मी तुम्हाला देतो. शिक्षणासाठी संवाद कौशल्य, ज्ञान आणि संधीची आवश्यकता असून आपल्या ज्ञानाचा उपयोग आजच्या जगासाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त आहे का, हे प्रत्येकाने तपासणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ए. एस. विश्वनाथन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. किट देण्यामागील उद्दिष्ट म्हणजे, विद्यार्थ्यांनी समाजाच्या वास्तविक समस्यांकडे पाहावे आणि आय.ओ.टी.च्या माध्यमातून त्यांचे समाधान शोधावे असेही ते पुढे म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना मनावरील योग्य नियंत्रण, योग्य विचार आदींचे महत्त्व पटवून दिले उद्योजकतेसाठी पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.शिकताना विद्यार्थ्यांनी दोनही बाजूंनी विचार करावा, स्वतःचे काम खुल्या दृष्टीकोनातून पहावे आणि ऐकून घेण्याची वृत्ती अंगीकारावी, असे त्यांनी मार्गदर्शन केले.
आय.ओ.टी.किटमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगधंद्याच्या तंत्रज्ञानाचा अनुभव मिळून त्यांचे करिअर अधिक सक्षम होण्यास मदत होईल असे श्री.विश्वनाथन व उपस्थितांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानताना डॉ. अनंत लोखंडे यांनी सांगितले.
कुडाळच्या एसआरएम महाविद्यालयाला उद्योग ऑटोमेशनसाठी आयओटी किट प्रदान…
