ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी निमित्त पाठांतर आणि भक्तीगीत गायन स्पर्धा…
⚡कुडाळ ता.१९-: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे राव बहाद्दूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळच्या वतीने कै. वामनराव नाडकर्णी स्मृती पाठांतर व भक्तीगीत गायन स्पर्धा ग्रंथालयात पार पडल्या. या स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाठांतर स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी तर भक्तीगीत गायन स्पर्धेत २० स्पर्धकांनी भाग घेतला.
सकाळच्या सत्रात शालेयस्तरावर मनाचे श्लोक आणि हरिपाठ पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद रा. शिरसाट यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर, श्री. मंगेश मसके, व परीक्षक श्री. विजय नाईक सर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे, पाठांतर स्पर्धा :- गट क्र. १ – प्रथम क्रमांक :- कु. नेहा नंदकुमार मुगडे, जि. प. शाळा कुंभारवाडा, कुडाळ, द्वितीय क्रमांक :- कु. गणेश प्रमोद म्हाडदळकर, जि. प. शाळा कुंभारवाडा, कुडाळ, तृतीय क्रमांक :- कु. विनायक श्रीकृष्ण ओगले, परबवाडा शाळा नं. १ वेंगुर्ले. पाठांतर स्पर्धा : गट क्र. २ – प्रथम क्रमांक :- कु. पृथा सुहास पुजारी, जि. प. कन्याशाळा, कुडाळ, द्वितीय क्रमांकः-कु. सोनाबाई तुकाराम पवार, जि. प. कन्याशाळा, कुडाळ,
दुपारच्या सत्रात भक्तीगीत गायन स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर, मंगेश मसके हे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मोहन मेस्त्री व राजाराम गव्हाणकर सर यांनी काम पाहिले. तर तबलावादक सिद्धेश कुंटे, हार्मोनियम वादक पपू नाईक यांची संगीत साथ लाभली. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्रके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार या वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. राजन पांचाळ यांनी केले. या स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी भाग घेतला.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :- भक्तीगीत गायन स्पर्धा गट क्र. १ बाल गट – प्रथम क्रमांक :- कु. प्रांजल सतीश तेरसे, कुडाळ हायस्कूल, कुडाळ, द्वितीय क्रमांक :-कु. सान्वी धोंडी गावडे, तृतीय क्रमांक :- कु. निधी चेतन धुरी, कुडाळ हायस्कूल, कुडाळ. भक्तीगीत गायन स्पर्धा – गट क्र. २ खुला गट – प्रथम क्रमांक कु. सुखी श्रीकृष्ण सामंत, द्वितीय क्रमांक :- कु. श्रुती शरद सामंत, तृतीय क्रमांक :- श्री. विनायक गावकर.
