⚡बांदा ता.१८-: साटम गुरुवर माझे आई, मजला ठाव द्यावा पायी , हा गजर करत नामस्मरण व भजन करून बांदा येथून पदयात्रेने दाणोलीला श्री साटम महाराज समाधी मंदिरात आलेले पदयात्री व भाविक श्री साटम महाराजांच्या चरणी लीन झाले. बांदा ग्रामस्थांची दाणोली पदयात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली . सकाळी ग्रामदैवत श्री बांदेश्वर भूमिका दर्शन घेऊन पदयात्रींनी प्रस्थान केले. मार्गात बांदा गणेशनगर, वाफोली रोड येथील श्री गणेश मंदिर तसेच सरमळे येथील श्री देव सपतनाथ मंदिर येथे पदयात्रींनी दर्शन घेतले.
पदयात्रा दाणोली येथे पोहोचल्यानंतर श्री समर्थ साटम महाराज समाधी दर्शन घेऊन भजन सेवेस आरंभ झाला. त्यानंतर महानैवेद्य व महाआरती होऊन महाप्रसादास सुरुवात झाली. या कार्यक्रमाला पदयात्री तसेच अनेक भाविकांनी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. पदयात्रेत युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला यांसह अनेक पदयात्रींनी सहभाग घेतला. या पुढील पदयात्रेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर आणि उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी सांगितले.
