मंत्री नितेश राणे: केसरकरांना राजघराण्यांनी भरपूर आशीर्वाद दिलाय,त्यामुळे त्यांनी अजूनही विचार करून आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा..
⚡सावंतवाडी ता.१९-: “आमचा प्रचार आधीपासूनच सुरू आहे. आज मी फक्त श्री देव पाटेकरांचे आशीर्वाद घेऊन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे,” असे विधान पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सावंतवाडीत केले.
यावेळी ते बोलतना पुढे म्हणाले की, निवडणूक ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार असून “सावंतवाडी सारख्या शहरात चांगले प्रकल्प कसे आणता येतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील. शहरातील जनतेने आमच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे ते म्हणाले.
पोटनिवडणुकीत पुरेसा वेळ न मिळाल्याने आम्ही आम्ही काही गोष्टी करू शकलो नाही परंतु आता पुढील पाच वर्षांसाठी संधी द्यावी असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
यावेळी त्यांनी दिपक केसरकर यांच्याबाबतही बोलताना राणें म्हणाले की “केसरकरांना राजघराण्यांनी भरपूर आशीर्वाद दिले आहेत. त्यांनी आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांच्याकडे अजून वेळ आहे, त्यांनी विचार करावा,” असे राणे म्हणाले.
कणकवलीतील राजकीय घडामोडींवर बोलताना ते म्हणाले, “कणकवलीत विरोधक एकत्र आले, यात काही नवीन नाही. आजपर्यंत कणकवलीची जनता राणेंच्या पाठिशीच उभी राहिली आहे.”
“आम्ही कोणावर टीका करणार नाही. कोणी कितीही डिवचले तरी आमचा मुद्दा हा फक्त विकासाचाच राहणार आहे.” तर निलेश राणे यांनी कणकवली शहर विकास आघाडीला दिलेल्या पाठिंबा“तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. त्यांनी पाठिंबा दिला असेल तर त्यांना कणकवलीत प्रचारासाठी यायला हवे.”“निवडणुका येत राहतात, जात राहतात. आपल्या माता-भगिनींचा अपप्रचार होऊ नये, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी,असे राणें यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
