पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत भाजपचा प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१९- : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रचाराचा जोरदार शुभारंभ आज करण्यात आला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला.

श्री देव पाटेकर यांच्या चरणी श्रीफळ वाढवून हा प्रचारारंभ पार पडला. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत भाजप सर्व जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


You cannot copy content of this page