⚡सावंतवाडी-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असून शिंदे शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. निता सावंत कविटकर यांनी आज मुरलीधर मंदिरात श्रीफळ वाढून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार अनारोजीन लोबो व सुरेंद्र बांदेकर यांनीही श्रीफळ वाढवून विजयाची मंगल कामना व्यक्त करत प्रचार आरंभ केला.
या शुभारंभ कार्यक्रमाला शिंदे शिवसेनेचे सर्व नगरसेवक उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
