रेडी येथे दीपोत्सव उत्साहात; युवा नेते विशाल परब यांची विशेष भेट…

⚡वेंगुर्ला ता.१७-: श्री देवी नाईकवस मित्र मंडळ, रेडी गावतळेवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपावली शो टाईम कार्यक्रमाला भाजप युवा नेते विशाल परब यांनी भेट देत उपस्थितांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे वातावरण उत्साहात आणि सांस्कृतिक रंगतदार सादरीकरणांनी भरून गेले.
या प्रसंगी रेडी गावचे विद्यमान सरपंच भाई राणे, माजी उपसरपंच नामदेव राणे, श्री देवी नाईकवस मित्र मंडळाचे अध्यक्ष भगवान राणे, तसेच स्वप्नील राणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक राणे, सागर राणे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

You cannot copy content of this page