दोन्ही उमेदवारांचे आदरपूर्वक हस्तांदोलन..
⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी येथे आज उमेदवारी अर्ज भरताना उबाठा गटाच्या उमेदवार सीमा मठकर व भाजपचे उमेदवार श्रद्धाराणी भोसले यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी मठकर यांनी श्रद्धाराणी यांना हस्तांदोलन केले. तसेच मठकर यांनी लखमराजे भोसले व उपस्थित सर्वांना हात जोडून नमस्कार केला.
सीमा मठकर यांनी उबाठा गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. एकूणच सध्या त्यांच्या नावाची चर्चा सावंतवाडीत जोरदार सुरू असताना आजा अचानक उमेदवारी अर्ज भरताना त्यांची आणि युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना आदरपूर्वक हस्तांदोलन केले
