प्रभाग 10 चे भाजप उमेदवार अँड. अनिल निरवडेकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज..

⚡सावंतवाडी ता.१७-: भाजपचे प्रभाग क्रमांक 10 मधील अधिकृत उमेदवार अँड. अनिल निरवडेकर हे निवडणुकींच्या रिंगणात उतरले असून, आज त्यांनी सावंतवाडी येथील समाज मंदिर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपला उमदेवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी त्यांनी आपला विजय निश्चित असल्याचे मत व्यक्त करत. प्रभाग क्रमांक 10 मधील जनता आपल्या सोबत असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page