⚡मालवण ता.१६-:
मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने स्व:बळाचा नारा देत जोरदार शक्तीप्रदर्शन करून नगराध्यक्ष पदासाठी सौ. शिल्पा यतीन खोत यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले.
आमची कोणाशीही स्पर्धा नाही, भाजपची विजयाची परंपरा अखंडित सुरु ठेवायची असून मालवणात नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदाच्या जागांवर भाजप शतप्रतिशत यश मिळवेल, असा विश्वास यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
मालवण भाजप कार्यालय ते नगरपालिका अशी रॅली काढत आणि घोषणा बाजी करत भाजपाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, अशोक सावंत, रणजित देसाई, सुदेश आचरेकर, मंदार केणी, महेश मांजरेकर, गणेश कुशे, यतीन खोत, विजय केनवडेकर, आपा लुडबे, पूजा वेरलकर, महानंदा खानोलकर, अन्वेषा आचरेकर, ललित चव्हाण, सन्मेष परब, राजू परुळेकर, दर्शना कासवकर, विकी तोरसकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
