⚡मालवण ता.१३-:
मालवण नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी अखेर ठाकरे शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन करून तीन उमेदवारी अर्ज दाखल करीत शुभारंभ केला. यावेळी ठाकरे शिवसेनेतर्फे प्रभाग २ मधून उमेश पुरुषोत्तम मांजरेकर आणि अनिता पॉली गिरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर प्रभाग ३ मधून ठाकरे शिवसेनेतर्फे उमेश अरविंद चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्र. २- अ या सर्वसाधारण आरक्षण असलेल्या जागेवर ठाकरे शिवसेनेतर्फे ज्येष्ठ शिवसैनिक उमेश मांजरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर २- ब या जागेसाठी ठाकरे शिवसेनेकडून अनिता गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्हीही उमेदवारांनी आज नगरपालिकेत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी ठाकरे शिवसेनेकडून माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी वं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. तर यानंतर प्रभाग क्र. ३ अ या सर्वसाधारण राखीव जागेसाठी ठाकरे शिवसेनेतर्फे उमेश अरविंद चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी चव्हाण यांच्या सोबत बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
