आशिष सुभेदार यांच्यावर युवासेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी…

⚡सावंतवाडी ता.१३-: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर सावंतवाडी तालुक्याची युवासेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे .

सदर नेमणूक ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपरकर उपनेत्या जानवी सावंत संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ युवा सेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट महिला जिल्हाध्यक्ष श्रेया परब यांच्या एकमताने व मागील अनेक वर्ष त्यांचे कार्य अहवाल पाहता ही महत्त्वाची युवासेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली तर सदर जबाबदारी योग्यरीत्या सांभाळून तालुक्यातील पुढील संघटना येत्या काही दिवसात घोषणा करणार असल्याचे श्री सुभेदार म्हणाले व वरिष्ठ ने जो विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार पक्ष वाढीसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे नूतन युवा सेनेचे तालुकाप्रमुख आशिष सुभेदार म्हणाले.

You cannot copy content of this page