गावराई येथे १६ नोव्हेंबर रोजी रोबाट उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…

सिंधुदुर्गनगरी ता १३
गावराई महिला मंडळ आयोजित व सौ सुप्रियाताई वालावलकर पुरस्कृत श्री देव गिरोबा मंदिर येथे रविवार १६ नोव्हेंबर रोजी रोबाट उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कुडाळ तालुक्यातील गावराई श्री देव गिरोबा मंदिर येथील पटांगणावर १६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या रोंबाट उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सायंकाळी ५ ते ६ वाजता खाऊ गल्ली कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे , सायंकाळी ६ ते ७ वाजता होम मिनिस्टर, ७ ते ८ वाजता लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स ,रात्री ८ ते १० वाजता मांडेश्वर ग्रुप नेरूर यांचे पारंपारिक रोबाट लोककला नृत्य व हलते देखावे प्रदर्शन होणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता उपस्थितांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी गावराई सरपंच सोनल शिरोडकर, माजी सरपंच जयमाला वेंगुर्लेकर, मनोरमा परब, महिला मंडळाच्या प्रणिता मेंस्त्री ,नेहा आयरे, रेश्मा भोगले, लक्ष्मी सावंत, कुंदा कदम, अश्विनी परब, अन्वी राऊत, मनीषा गावडे यांच्यासह गावातील महिलांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलांसह उपस्थित राहून लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन गांवराई महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page