विशाल परब:सुवर्ण सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या महोत्सव बक्षीस वितरण उत्साहात..
⚡सावंतवाडी ता.११-:
वाचन संस्कृतीच्या पन्नास वर्षांच्या सोनेरी वाटचालीचा आजचा क्षण भाग्याचा असे प्रतिपादन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी केले.सुवर्णसातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी बक्षीस वितरण समारंभाचा दिमाखदार शुभारंभ आज सातार्डा येथील महापुरुष मंदिर सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा नेते श्री. विशालभाई परब यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. परब म्हणाले, “सातार्डा पंचक्रोशीतील नागरिकांनी गेल्या पाच दशकांपासून वाचन संस्कृतीची जपणूक करून ती अधिक संपन्न केली आहे. आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती टिकवून ठेवणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनाचा मान मला मिळाल्याचा खरोखरच अभिमान वाटतो,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगेश म्हस्के (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ) होते. यावेळी व्यासपीठावर दत्ता कवठणकर (उद्योजक), अनंत वैदय (माजी अध्यक्ष), शर्वाणी गावकर (माजी सभापती), श्रुतिका बागकर (माजी पंचायत समिती सदस्य), रुपेश राऊळ (सावंतवाडी विधानसभा प्रमुख उबाठा), संदिप रावणी प्रभु (सरपंच, सातार्डा), अजित कवठणकर (सरपंच, कवठणी), प्रतिक्षा मांजरेकर (सरपंच, सातोसे) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास स्थानिक नागरिक, वाचनप्रेमी, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवी बक्षीस वितरणानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालयाच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
