मनसेचे महेश परब यांनी घेतली माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची भेट…

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात झाली चर्चा..

⚡सावंतवाडी ता.०७-: आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष महेश परब यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची भेट घेतली. या भेटीत आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसले तरी जागावाटप आणि निवडणुकीतील रणनीती याबाबत चर्चा झाल्याचे समजते. .

या प्रसंगी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, राजू कासकर, आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन जुवाटकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page