मालवणचे सुपुत्र आसिम सादिक मेमन सि. ए परीक्षेत कोल्हापूर विभागामधून प्रथम..!

⚡मालवण ता.०७-:
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंटस् (सीए) च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला असून कोल्हापूर विभागामधून मालवणचे सुपुत्र आसिम सादिक मेमन याने प्रथम क्रमांक पटकविला आसीम सादीक मेमन हे मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून मालवणच्या भारत जनरल स्टोअर्सचे मालक व ज्येष्ठ व्यापारी सादीक दादापे मेमन यांचे चिरंजीव तर मसूद दादापे मेमन यांचे पुतणे आहेत.

आयसीएआय’तर्फे सप्टेंबरमध्ये झालेल्या परीक्षा कोल्हापूरमधील २४९ विद्यार्थ्यांनी दिली होती त्यातील ३४ जण उत्तीर्ण झाले.त्यात मालवणचे सुपुत्र आसिम सादिक मेमन याने प्रथम क्रमांक पटकविला

याबाबत प्रतिक्रिया देताना आसिम मेमन यांने त्यांच्या आजी व मालवणच्या ज्येष्ठ नागरीक खैरुन्नीसा मेमन यांच्या शैक्षणिक जाणिवांना न्याय द्यायचा प्रयत्न असतो असे सांगितले त्यांनी
आजी खैरुन्नीसा मेमन, वडिल सादीक मेमन, आई रुख़साना मेमन आणि काका व मालवणचे ज्येष्ठ व्यापारी मसूद मेमन, काकू शहनाझ मेमन आणि टोपीवाला हायस्कूल मालवणचे शिक्षक, विवेकानंद महाविद्यालय , कोल्हापूर येथील प्राध्यापक तसेच सर्व मार्गदर्शक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या यशाबद्दल आसिम मेमन यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page